सुसंस्कृत, स्वच्छ आणि प्रगत आचिर्णे – सर्वांचा सहभाग, सर्वांचा विकास


ग्रामपंचायतीचे नेतृत्व कुशल प्रतिनिधींच्या हातात
गावाच्या विकासाची धुरा सरपंच वासुदेव अनंत रावराणे यांच्या खांद्यावर असून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडत आहेत.
श्रीमती सविता कडू या उपसरपंच पदाची जबाबदारी पार पाडत असून सरपंच यांच्या बरोबरीने गावच्या कामात सहकारी करत आहेत.
आचिर्णे गावाला तंटा मुक्त गाव पुरस्कार मिळाला असून या गावातील छोटे मोठे वाद हे गावातच तंटा मुक्त कमिटी मार्फत मिटवले जातात



